Rajgad News l मार्गासनीत अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात ४६ वर्षाची अखंड परंपरा कायम

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील मार्गासनी येथे अखंड हरिनाम सप्ताह,ग्रंथराज सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास
नुकतीच सुरुवात करण्यात आली.ह.भ.प,मारुती महाराज वालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरु असुन
विना व कलशपुजन हनुमंत महाराज वालगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सप्ताहात दीपक महाराज मोरे,तुषार महाराज दळवी,सुनिल महाराज राजीवडे,पांडुरंग महाराज गव्हाणे,नवनाथ महाराज नवस्कर,कांता महाराज,कांता महाराज चोरघे, मारुती महाराज वालगुडे,हर्षद महाराज दसवडकर,मयुर महाराज कोंडे यांची किर्तेने होणार आहेत.

तसेच या सप्ताहास तुकाराम महाराज वालगुडे,लक्ष्मण महाराज उफाळे,एकनाथ महाराज उफाळे,गोरक्ष महाराज वालगुडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
नसरापुर,वांगणी,वाजेघर,पानशेत,पासली,वेल्हे,सोंडे,वेळु,शिरवळ परिसरातील नागरिक मोठ्या संस्खेने उपस्थित असतात.

To Top