Baramati crime l वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई : घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड : तीन मोटारसायकलीसह १.६५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील  वडगाव निंबाळकर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त पथकाने घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तीन मोटारसायकलींसह एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तीन जणांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून चोरीस गेलेल्या वस्तूंसह तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच इतर ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांबाबतही तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. संबंधित आरोपींवर पुढील कारवाई सुरू असून तपास अधिक सुरू आहे.
To Top