सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोरच्या वरंधा घाटात छोटा हत्ती टेम्पो खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात नऊ जण जखमी तर भोर- कापूरहोळ मार्गावर संगमनेर( माळवाडी ) ता.भोर येथे भोरबाजूकडे येणाऱ्या दुचाकी वाहनाला चार चाकीनी धडक दिल्याने पुणे येथील एका तरुणाचा भोर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.२९ घडली.
भोर तालुक्यात असे वेगवेगळे दोन अपघात घडले असून वरंधा घाटातील अपघातातील नऊ जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एक गंभीर जखमी असल्याने पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.तर संगमनेर माळवाडी येथे झालेल्या पुणे बाजूकडून येणारी दुचाकी व भोर बाजूकडून पुण्याला जाणाऱ्या चारचाकी वाहनांची धडक होऊन दुचाकी वरील पुणे कोथरूड येथील तरुणाचा मृत्यू झाला.घटनास्थळी प भोर पोलीस तसेच राजगड पोलीस तात्काळ पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
