सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील अजित सुरेश जाधव यांची महाराष्ट्र पोलीस दलातील राज्य गुप्तवार्ता विभागाच्या बारामती येथे मुख्य गुप्तवार्ता अधिकारी ( वर्ग १ ) पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
यापूर्वी त्यांनी १७ वर्षे विविध ठिकाणी सेवा केली आहे. या कार्यकाळात त्यांनी नाशिक, संगमणेर, वाशिम, पुणे शहर, ग्रामीण येथे सेवा केली आहे. त्यांनतर मागिल पाच वर्षापूर्वी विदर्भातील वाशिम येथे वरिष्ठ गुप्तवार्ता अधिकारी ( वर्ग २ ) म्हणून नियुक्ती झाली होती.
अजित जाधव यांची बारामती येथे मुख्य गुप्तवार्ता अधिकारी ( वर्ग १ ) पदी नियुक्तीचे आदेश २३ मार्च प्राप्त झाले. तसेच त्यांनी कालच आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.
