सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर - संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील जनता गोरगरीब असून नवनवीन आजारांवर बहुतांशी लोकांना आर्थिक बोजा वाढत असल्याने उपचार करणे कठीण होते.या पार्श्वभूमीवर नागरिकांना विविध आजारांवर मोफत आरोग्य सेवा मिळणे गरजेचे असल्याने मोफत महाआरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भोर,राजगड, मुळशीच्या विकासकामांबरोबर जनतेच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी कायमच कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोरला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाआरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिर अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट भोर-राजगड-मुळशी, जि. प. पुणे,पं. स. भोर,भोर नगर परिषद,भोर आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.१३ आयोजित करण्यात आले होते.यावेळी माजी आमदार थोपटे बोलत होते.शिबिरात बॉडी एक्स-रे महिला १७८,मोतीबिंदू- २६८,चष्मे- १०५१,ऑपरेशन- ६८,एन्जिओग्राफी- २१,जनते विभाग- ३६२ असे एकूण १ हजार ९१० नागरिकांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ झाला.तर शिबिरात हृदयाच्या शस्त्रक्रिया,किडनी स्टोन, दंतचिकित्सा,यकृताचे आजार,श्रवण यंत्रांची नोंदणी, मेंदू शस्त्रक्रिया,डोळ्यांचा तिरळेपणा,स्त्रियांच्या गर्भाशय व रक्तांच्या गाठींची शस्त्रक्रिया ,वंधत्व निवारण व उपचार,सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रिया, किडनी आजार डायलिसिस आदींसह अनेक आजारांच्या मोफत तपासण्या करण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार संग्राम थोपटे,जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे,पंचायत समिती सदस्य सुषमा चव्हाण,गीतांजली आंबवले,उत्तम थोपटे डॉ. ओंकार थोपटे,डॉ.आनंद साबणे,उपनगराध्यक्ष ॲड.जयश्री शिंदे डॉ.महेश तिडके,सचिन मांडके,संतोष शेडगे,राजेंद्र शेटे,सुभाष कोंढाळकर,प्रवीण शिंदे आदींसह आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
