Khandala Breaking l पांदी परिसरात आभाळ फाटलं..! विज कोसळून शेतात काम करणाऱ्या विवाहतेचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
लोणंद : प्रतिनिधी 
खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे दुर्दैवी घटना घडली असून, शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून एका विवाहित युवतीचा मृत्यू झाला आहे. ही घटना कराडवाडी (ता. खंडाळा) येथील ‘पांदी’ नावाच्या शिवारात घडली.
मृत्यू झालेल्या युवतीचे नाव सोनाली अजित कराडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कराडे या नेहमीप्रमाणे पांदी नावाच्या शिवारात शेळ्या चारत असताना सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन पावसासह वीजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे कराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
To Top