सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जिल्हा परिषदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपद हे आमचेकडे येणे योग्य होते. आम्ही २८ वरून ३३ मते मिळवून प्रिया ताईंना अध्यक्ष केले. विरोधकांनी कितीही टिका केली तरी आम्ही अध्यक्षपद खेचुन आणले आहे असे आवर्जुन ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
कावडी (ता. जावली ) गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदवीला असल्याने या गावच्या पहाणीसाठी तसेच महिला दिनाचे औचित्य साधुन महिलांच्या सन्मान सोहळ्या प्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजुभैय्या भोसले, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सौ. जयश्रीताई गिरी, पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, जिल्हा परिषदचे सदस्य अजित साळुंखे, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, जावळी बँकेचे चेअरमन विक्रम भिलारे , व्हाईस चेअरमन चंद्रकांत दळवी , जावली तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संदिप परामणे आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कावडी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुंदर पद्धत्तीने राबविले असून जिल्हयात नव्हे तर राज्यात पहिल्या क्रमांकाने येईल त्यासाठी वसंत भाऊंचे योगदान चांगले आहे असे गौरवोद्गार काढून ते पुढे म्हणाले प्रियाताई, मी , जयकुमार गोरे , महेश शिंदे , अतुल बाबा आम्ही मिनी मंत्रालयाच्या माध्यमातुन जिल्ह्याचा कारभार चांगला चालवु असे आश्वासन देत मानकुमरे भाऊंनी शिक्षण सभापतीसह उपाध्यक्ष पद भुषविले असल्याने त्यांना आता मोठया पदावर न्यायचं आहे हे लक्षात ठेवा असे उपस्थितांना ना. भोसले यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले आता निवडणूका संपल्या आहेत त्यामुळे जावळी तालुक्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी भाजप सोबत रहावे असे आवाहन करीत मतदार संघाची पुर्नरचना झाली तरी मी जावली सोडणार नाही असा पुर्नविचार बोलुन दाखविला. आमचा नेता एवढा खंबीर आहे की जावळी मतदासंघ कसा टाकायचा याची ताकद आमच्या नेत्यांमध्ये आहे त्यामुळे आमच्या नादाला कुणी लागु नये असा ईशारा विरोधकांना ना. भोसले यांनी दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्रियाताई शिंदे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करून डायबीटीस, कर्करोग आणि हार्ट अटॅक या आजारांचे प्रमाण महिलांमध्ये जास्त दिसुन येत असताना जेवानातील तेला बाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगुन सेंद्रीय विषयुक्त किचन अभियान राबविणे महिलांनी गरजेचे असल्याचे सांगीतले. त्या पुढे म्हणाल्या शितपेयासह स्टींग पिणे शरिराला इतके भयानक आहे कि शरिरावर होणाऱ्या परिणामांचा आपण विचारच करू शकत नाही त्यामुळे महिलांनी हे येणार भयानक आक्रमण रोखण्याच काम करावे असे आवाहन सौ. शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे म्हणाले कावडी गावाने अभियानात सहभागी होताना शासनाच्या सर्व निकषाचे काटेकोर पालन केले असुन १०० टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविणार असल्याचे सांगून ग्रामस्थांनी खुप परिश्रम घेतले असल्याचे सांगुन ग्रामस्थांचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले कावडी गावाला पर्याटण क्षेत्र बनविण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून सध्या शिवेंद्रसिंह राजे यांचे नावे क्रिडांगण तयार करण्यात आले आहे तर बोट क्लब , व्यायाम शाळा , छोटे उद्योगासह अनेक योजना राबविण्यात येतील. संपूर्ण गाव सौर उर्जेचे असून गावामध्ये आवळ्याची लागवड मोठया प्रमाणात केल्याने आमचा आवळ्याचे गाव म्हणून ओळखले जाणार असल्याचे सांगीतले.
