सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
प्रतिनिधी : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
सुपे आणि जगतापवस्ती येथील श्रीराम मंदिरामध्ये सकाळपासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी अभिषेक, पुजा, भजन, रामजन्माचे अभंग सादर करण्यात आले.
दुपारी बारा वाजता मंडपातील 'श्री ' च्या पाळण्यावर फुले उधळुन श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामजन्मानंतर पाळणा गीते सादर करुन महाआरतीचा कार्यक्रम झाला. येथील दंडवाडी अंतर्गत असणाऱ्या जगतापवस्ती येथील श्रीराम मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हभप भरत शिंदे, शामसुंदर ढवळे यांचे कीर्तन झाले. तर चैतन्य महाराज राऊत यांचे राम जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना सुंटवड्याचे व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
