सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
देशभरातील काही विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून महाराष्ट्रातील बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी माध्यमांशी संवाद साधताना पोटनिवडणुका सर्वांच्या समन्वयातून बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका मांडली. या भूमिकेचे बारामती तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आल्याची माहिती भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिली.
खैरे म्हणाले की, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, भाजप प्रदेशाध्यक्ष Ravindra Chavan, तसेच राज्याचे नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीतील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासह सर्व पक्षांशी समन्वय साधून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
बारामती तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेणारे आहेत. माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व अकस्मात आपल्यातून निघून गेल्याने बारामतीकरांमध्ये दुःखाची भावना आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा सर्वपक्षीय निर्णय घेतला तर तीच Ajit Pawar यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही खैरे यांनी नमूद केले.
यासाठी बारामती तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते तसेच विविध सामाजिक संघटनांची भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
