Purandar News l शिवरी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी(ता.पुरंदर) येथे शनिवार दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. अतिशय उत्साह व आनंदाच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला गर्दीचा प्रचंड उच्चांक झाला होता. अतिशय दर्जेदार, उत्कृष्ट नृत्याचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे व प्रमुख पाहुणे पुरंदर पंचायत समितीचे सदस्य माणिक निंबाळकर व पुरंदर पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे साहेब हे होते. 
           या कार्यक्रमाच्या सुरुवातीला द्वारकामाई चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आत्माराम कामथे व कार्याध्यक्ष पंढरीनाथ कामथे (पोलीस निरीक्षक) यांच्या वतीने गतवर्षीतील गुणवान विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर त्या गुणवंत विद्यार्थ्यांना कै. इंदुबाई काशिनाथ लिंभोरे यांच्या स्मरणार्थ विकास काशिनाथ लिंभोरे यांस कडून ट्रॉफी देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथील दोन वर्गखोल्या लोकवर्गणीतून बांधण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवरी येथे रूम टू रीड या संस्थेच्या वतीने एक सुसज्ज वाचनालय तयार करण्यात आले आहे. तालुका पातळीवरील, जिल्हा पातळीवरील स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केलेल्या विजयी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, ग्रामस्थांच्या मदतीमुळे शाळेचा सर्वांगीण विकास झालेला आहे. वार्षिक स्नेहसंमेलनात मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देते ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक लाख पाच हजार रुपये बक्षीस रक्कम जमा झाली. कै. गंगाराम गेणू लिंभोरे यांच्या स्मरणार्थ वासुदेव (देवा शेठ) लिंभोरे यांच्याकडून शाळेतील सर्व मुलांना ट्रॅक सूट घेण्यासाठी 50 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
वार्षिक स्नेहसंमेलनात शेतकरी गीत, शिवाजी महाराजांचा पोवाडा, देशभक्तीपर गीत, लावणी, समाज प्रबोधन गीते इत्यादींचे सादरीकरण करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी वाळुंज केंद्राच्या केंद्रप्रमुख सुरेखा कामथे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियंका तुषार कामथे, उपाध्यक्ष संतोष उत्तम लिंभोरे, सदस्य लहू लक्ष्मण कामथे,अंकुश लक्ष्‍मण कामथे, संतोष बबन जगताप, सचिन लहू कामथे, अजय विजय लिंभोरे, ऋतुजा किरण कामथे, स्वरांजली तेजस कामथे, सुवर्णा संदीप लिंभोरे, प्रियंका सोमनाथ लिंभोरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा शिक्षण समितीचे कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील कुंजीर , कार्याध्यक्ष सुनील जगताप, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनोज सटाले, गणेश कामठे, पुरंदर तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक कुंभार, अश्विनी फुंदे, वर्षा जगताप, आरती सोनवणे, रयत शिक्षण संस्था सल्लागार शंकरराव मुगुटराव कामथे, नवनाथ गायकवाड, शिवसेना नेते राजाभाऊ क्षीरसागर, प्रविण कामथे, नवनाथ कामथे,विकास कामथे , नारायण कामथे, देवा शेठ लिंभोरे, समीर कामथे, धनंजय कामथे, शिवाजी शिवरकर, अनंता लिंभोरे, हनुमंत वाबळे हे उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे श्वेता जगताप, मेघराज कुंभार , प्रकाश जगताप, रूपाली हरिहर,निर्मला पोमण या शिक्षकांनी नियोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश जगताप , निर्मला पोमण व रूपाली हरिहर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्वेता ज्ञानेश्वर जगताप यांनी मानले.
To Top