Satara News l साताऱ्यात तृतीयपंथी समुदाय आक्रमक : बिपाशा उर्फ राजू मनिक्कम यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सातारा : प्रतिनिधी 
साताऱ्यातील तृतीयपंथी, जोगती आणि आराधी समाजाने राजू मनिक्कम नावाच्या व्यक्तीविरुद्ध एल्गार पुकारला आहे. मनिक्कम यांच्या कृत्य आणि वर्तणुकीमुळे समाजात मोठी अस्वस्थता पसरली असून, त्यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू मनिक्कम यांच्या काही वादग्रस्त कृत्यांमुळे तृतीयपंथी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट असून, भविष्यात अशा निंदनीय घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने आताच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. राजू मनिक्कम यांच्यावर कायद्यानुसार कडक पावले उचलण्यात यावीत. समाजाची बदनामी किंवा भावना दुखावणारे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने चोख खबरदारी घ्यावी.
 प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पीडित समाजाला न्याय द्यावा. आमच्या समाजाच्या भावनांशी खेळणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर आम्हाला पुढील पाऊल उचलावे लागेल, असा इशारा साताऱ्यातील समाजबांधवांनी दिला आहे.

या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण तृतीयपंथी समुदाय एकवटला आहे. प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली न झाल्यास आंदोलन छेडण्याचे संकेतही या निवेदनाद्वारे देण्यात आले आहेत. आता प्रशासन या प्रकरणावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
To Top