सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
सुपे येथील ख्वाजा शाहमन्सुर दर्गा आणि जामा मस्जित येथे रमजान सणाच्या २६ व्या रोजाच्यानिमित्ताने पोलिस आणि पत्रकारांकडुन येथील मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सायंकाळी सुर्य मावळताना रमजान उपवासाची सांगता करण्यात येते. या दरम्यान सोमवारी ( दि. १६ ) सुप्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ख्वाजा शाहमन्सुर दर्गा आणि जामा मस्जित येथे मुस्लिम बांधवांना वेगवेगळ्या फळांचे वाटप करण्यात आले तसेच येथील एकता व बंधुत्वता अखंड अबाधित रहावी. यासाठी पोलिस आणि पत्रकारांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी दर्गा ट्रस्टचे चीप ट्रस्टी हमीद डफेदार, ट्रस्टी मोहसीन बागवान, माजी चीप ट्रस्टी युनूस कोतवाल, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, विशाल गाजरे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार जैनक, आदेश मावल, सोमनाथ होले, पत्रकार आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
