Supe News l बोरकरवाडी तलावात सोडले मत्स्यबीज

सोमेश्वर रिपोर्टर live
 सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील बोरकरवाडी येथील तलावात मत्स्यबीज सोडण्यात आले. पुणे येथील शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या मत्स्यबीज संचयनचा पंचनामा करण्यात आला. 
            मस्यबीज नजीकच्या तांबोळी मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून आणुन येथील तलावात सोडण्यात आले. भारतीय प्रमुख कार्य ( मिश्र ) प्रजातीचे ४० ते ५० सेमि आकाराचे मत्स्यबीज संचयन करण्यात आले. तसेच मत्स्यबीज निरोगी, चपळ व गुणवत्ता पूर्व असल्याची खात्री करण्यात आली. तसेच तरडोली तलावातही मत्स्यबीज सोडण्यात आल्याची माहिती ठेकेदार ऋषिकेश तावरे यांनी दिली.
 
यावेळी ते मत्स्यबीज संचयन करते वेळी पुणे शासकीय मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे सहाय्यक आयुक्त अर्चना शिंदे, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी दि. पो. गुंड, अविनाश बंडगर, ठेकेदार ऋषिकेश तावरे, पोलीस पाटील राहुल बोरकर, किसन मुळीक, मारुती कदम व पोपट सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
To Top