Sugar Factory l आजपासून तुटणाऱ्या उसाला 'सोमेश्वर' देणार ३५०० हजारांची पहिली उचल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल एकरकमी ३३०० रूपये प्रतिटन जाहीर केली आहे. मात्र फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसाला टनाला १०० रुपये तर मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला टनाला २०० रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे १ मार्च पासून तुटणाऱ्या ऊसाला टनाला ३५०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.  
              जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अनेक कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. जिल्ह्यातील सोमेश्वर माळेगाव व भीमा पाटस हे तीनच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून २० ते २५ मार्च च्या आसपास हे तिन्ही कारखाने आपला गाळप हंगाम बंद करण्याची शक्यता आहे. 
           उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असले तरी साखर कारखान्यांनी आपली स्वतःची वाढवलेली दैनंदिन गाळप क्षमतेमुळे हंगाम लवकर उरकत आहे. ऊसटंचाईच्या काळातही येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने या हंगामात साडेतेरा ते चौदा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून कारखान्याने आज अखेर ११ लाख ३५ हजार में. टन ऊसाचे गाळप करत १३ लाख ३१ हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर ११. ७९ चा जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा राखत आघाडी घेतली आहे. सोमेश्वर कारखान्याने आजपर्यंत १२० दिवसात दैनंदिन साडेनऊ हजार टन प्रतिदिन अशा उच्चांकी क्षमतेने अकरा लाख टन गाळप केले आहे. दैनंदिन साखर उतारा तब्बल तेरा टक्के आहे. त्यामुळे अंतिम सरासरी उतारा बारा टक्क्यांच्या पुढेच असणार आहे. 

सोमेश्वरने हंगामाच्या सुरवातीलाच साडेतेरा ते चौदा लाख टन गाळप करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. अपवाद वगळता सभासदांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने कारखाना मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालेल आणि साडेतेरा लाख टन गाळप पूर्ण होईल असा अंदाज आहे. सध्याच्या गाळपात सोमेश्वर जिल्ह्यात तिसरा तर राज्यात आठवा आहे. तसेच साखर उताऱ्यात सोमेश्वर जिल्ह्यात प्रथम आहे.
To Top