सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर परिसरात ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी 2026) सायंकाळी 6.30 वाजता होळ रोडलगत असलेल्या पत्रा शेडमध्ये छापा टाकला.
कारवाईत श्रीकांत केलार शेलार (वय 35, रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती, जि. पुणे) याला ऑनलाइन “फन टार्गेट” नावाचा जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीकडून जुगारासाठी वापरले जाणारे संगणक साहित्य व रोख रक्कम असा एकूण 11 हजार 90 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये तोशिबा कंपनीचा मॉनिटर (अं. किंमत 4 हजार रुपये), झेब्रॉनिक्स कंपनीचा सीपीयू (अं. किंमत 5 हजार रुपये), कीबोर्ड, वही-पेन तसेच रोख 1 हजार 770 रुपये असा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आबा विलास जाधव यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नाळे हे करीत आहेत.
