Baramati News l एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूलच्या यशाची परंपरा कायम; सीबीएसई दहावी परीक्षेत १००% निकाल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
 समर्थ ज्ञानपीठ संचलित, वाघळवाडी येथील एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २०२५-२६ च्या सीबीएसई दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. शाळेने आपली १००% निकालाची गौरवशाली परंपरा यंदाही कायम राखली असून, अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून प्रशालेचा नावलौकिक वाढवला आहे. 

या परीक्षेत करंडे ऋषभ सचिन याने ९५.००% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. गायकवाड आर्या अमोल हिने ९२.६०% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच गायकवाड मानसी कमलाकर (९१.६०%), सांकरे सुमित एकनाथ (९१.००%) आणि खंडाळे संस्कृती राहुल (९१.००%) यांनीही घवघवीत यश मिळवत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल समर्थ ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष श्री. अजिंक्य हनुमंतराव सावंत, मुख्याध्यापक श्री. अजित अर्जुन वाघमारे व सर्व शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले. 

विद्यार्थ्यांची जिद्द, शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच हे यश शक्य झाले आहे, अशा शब्दात संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती रोहिणी सावंत, श्री. चैतन्य सावंत व सौ. धनश्री सावंत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यशस्वी विद्यार्थ्यांवर सोमेश्वरनगर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To Top