भोर - संतोष म्हस्के
इतर तालुक्यांच्या तुलनेत भोर तालुक्यात विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून सभासद अत्यल्प कर्ज घेत असतात.नवीन उद्योगांसाठी पुणे जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार आहे. विकास सोसायटीच्या माध्यमातून नवीन उद्योग उभारून नव- नवीन प्रकल्प हाती घेऊन उद्योगधंद्यासाठी कर्ज घेण्याचे धाडस सभासदांनी करावे.तर सोसायटीच्या सचिवांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच संस्थेच्या हितासाठी काम करावे असे प्रतिपादन माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
भोर तालुका तालुका देखरेख संघ मर्यादित भोर व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार मेळावा व केडर आदेश वितरण समारंभ प्रसंगी माजी आमदार थोपटे बुधवार दि.१५ बोलत होते.माजी आमदार संग्राम थोपटे,संचालक भालचंद्र जगताप,सोमनाथ सोमाणी,विभागीय अधिकारी आशिष मारणे,मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीराम थोरात,सहायक वितरक अधिकारी आदिनाथ पालवे,वसुली अधिकारी विनोद काकडे,संतोष केळकर,महेंद्र तावरे,संदीप चक्के,सागर दुधाणे तर सचिव,चेअरमन व संचालक उपस्थित होते.संचालक भालचंद्र जगताप बोलताना म्हणाले विकास सोसायटीच्या सचिवांचे काम उत्कृष्ट असून कामात पारदर्शकता आहे.सचिवांना दुर्गम डोंगरी भागातील विकास संस्थांमध्ये काम करावे लागते.
त्यांचा अनेक वर्षांचा प्रश्न प्रलंबित होता तो केडरच्या माध्यमातून मार्गी लागला आहे.केडरच्या निमित्ताने सचिवांना सुरक्षा कवच मिळाले आहे.जवळजवळ भोर तालुक्यात नवीनच ३४ सचिवांची नेमणूक झाली आहे.सचिवांनी संस्थेच्या हितासाठी काम करावे.
