Baramati News l तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये कुतवळवाडी शाळेचा द्वितीय क्रमांक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेमध्ये येथील कुतवळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शानदार कामगिरी करीत द्वितीय क्रमांक मिळविला. केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थाचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले होते. 

       त्यानुसार पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुका स्तरावरील परसबाग स्पर्धेत कुतवळवाडी शाळेने द्वितीय क्रमांक मिळवला. तर प्रथम क्रमांक मळशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच तृतीय क्रमांक पाहुणेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने पटकावला. या कामगिरीबद्दल पंचायत समितीच्यावतीने ८ हजार रुपयांचे प्रोत्साहन पर अनुदान शाळेला प्राप्त झाले आहे. 

या यशामागे सरपंच रूपाली भोसले, लक्ष्मीकांत भोसले, गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी, विस्तार अधिकारी नीलिमा मेमाणे, केंद्रप्रमुख शरद मचाले आदींचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले. तर शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचे याकामी सहकार्य मिळाले.

To Top