सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती l प्रतिनिधी
बारामती गाणगापूर येथील श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बारामतीमधील भाविकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दर पौर्णिमेला बस सोडण्याच्या मागणीचा विचार करून, आता बारामती ते गाणगापूर अशी दररोज बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सुनेत्रा पवारांच्या सूचनेनुसार निर्णय गाणगापूरसाठी बस सेवा मिळावी, अशी मागणी बारामतीतील नागरिक व भाविकांकडून सातत्याने होत होती. पंचायत समितीच्या मासिक बैठकीत हा विषय चर्चेला आल्यानंतर, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सभापती किरण तावरे यांनी पाठपुरावा करून ही दैनंदिन बस सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आज या नवीन बस सेवेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करून प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला उपस्थित किरण तावरे (सभापती, पंचायत समिती बारामती), शुभांगीताई आगवणे (उपसभापती), प्रविण शिंदे (आगार व्यवस्थापक), प्रविण माळशिकारे व, विशाल सावंत (वाहतूक निरीक्षक), गजानन मोहिते (वाहतूक नियंत्रक), दिग्विजय कोकरे, निलेश तावरे, गणेश काशिद, अभिजीत देगलूरकर
यावेळी बसचे चालक सरफराज झारी आणि वाहक दत्तात्रय वाळुंजकर यांचाही सत्कार करण्यात आला. बारामती व एमआयडीसी आगारातील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने भाविक या प्रसंगी उपस्थित होते.
