Baramati News l दिवंगत लोकनेते अजित पवार यांच्या दुःखाचे सावट : मुरूम येथे डॉ. आंबेडकर जयंतीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुरूम (ता. बारामती) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त मुरूम येथे दरवर्षी विविध सांस्कृतिक व बैलगाडा शर्यत यांसारख्या कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात येत असते. मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत सुमारे साडेतिनशे ते चारशे बैलगाड्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. तसेच गाण्यांचे कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’, भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे हा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात येत होता.
मात्र, गेल्या दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे नेते तथा उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे. या पार्श्वभूमीवर मुरूम येथील जयंती उत्सव आयोजन समितीने यावर्षीचे बैलगाडा शर्यत व आर्केस्ट्रा यांसारखे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षी जयंती महापुरुषांवरील व्याख्यान , सामुदायीक प्रार्थना व महामानवाच्या प्रतिमेची मिरवणूक यांसारख्या साध्या उपक्रमाने पार पडली जाणार आहे.
आयोजक समस्त बौद्धजन मंडळ मुरूम यांच्या वतीने सांगण्यात आले की, दादांवरील प्रेम व आदर व्यक्त करण्यासाठी तसेच सध्याच्या शोकपूर्ण वातावरणाचा विचार करून बैलगाडा शर्यत, ऑर्केस्ट्रा व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम यावर्षी आयोजित करण्यात येणार नाहीत..
To Top