Baramati News l बारामती वकील संघटना आयोजित ‘न्यायमंदिर चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा संपन्न

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘न्यायमंदिर चषक २०२६’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सदरील स्पर्धेचे उद्घाटन अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.सी. बर्डे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, बारामती येथे पार पडले.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे, महाड, मावळ, राजगुरूनगर, जुन्नर, कराड, सातारा, अहिल्यानगर, राहाता, फलटण, वाई, दहिवडी, माळशिरस, पिंपरी चिंचवड, दौंड, इंदापूर आदी ठिकाणांहून संघांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे बारामतीच्या दोन महिला क्रिकेट संघांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत स्पर्धेची शोभा वाढवली.
स्पर्धेदरम्यान युवा नेते जय पवार, युगेंद्र  पवार तसेच नगराध्यक्ष सचिन सातव व इतर नगरसेवक उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन दिले. अतिशय रोमहर्षक सामन्यांनंतर माळशिरस संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर बारामती ‘A’ संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. श्रीकांत पन्हाळे ११, सातारा संघाने तृतीय तर अहिल्यानगर संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कार पुढीलप्रमाणे-
मॅन ऑफ द मॅच (फायनल) – तन्मय देव (माळशिरस)
मॅन ऑफ द सिरीज – शक्ती माने (माळशिरस)
बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज – शक्ती माने (माळशिरस)
बेस्ट बॉलर ऑफ the सिरीज – डी. एस. माने (माळशिरस)
बेस्ट फिल्डर – अनुराग खाडे (बारामती)
सर्व सामन्यांचे युट्युबवर थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बारामती येथील सिनियर व ज्युनियर वकील, बारामती वकील संघटनेची कार्यकारिणी तसेच क्रिकेट कमिटीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रसाद खारतुडे यांनी प्रास्ताविक केले. क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष ॲड. योगेश राऊत यांनी आभार मानले, तर ॲड. समीर शेख यांनी सूत्रसंचालन केले.
To Top