सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर - संतोष म्हस्के
संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरे भाविकांनी फुलली
संकष्टी चतुर्थीनिमित्त भोर शहरासह ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये अभिषेक,भजन,आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसर गजबजुन गेले होते.
संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण महत्त्व असल्याने गावोगावी गणेश मंदिरांपुढे रांगोळी काढण्यात आले होते तर मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
तर गणेशाची आरती होऊन बहुतांशी मंदिरांमध्ये गावच्या मंडळांचे भजन पार पडले. भाविक भक्त भजनात मंत्रमुग्ध होऊन गेले होते. तर अनेक ठिकाणी भाविकांना स्थानिकांकडून फराळ वाटप करण्यात आले.नेरे-धावडी खिंडी निसर्ग रम्य गणोबा मंदिरात पळसोशी, बाजारवाडी,हातनोशी,वरवडी,पाले पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.एवढी मंदिर परिसर खूलून गेला होता.यावेळी गोपाळ उभे,संपत दरेकर,सुरेश चव्हाण,रघुनाथ गोळे,दत्तात्रय आरडे,उत्तम चव्हाण,बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.
