Bhor News l भोर एसटी बसस्थानकात अनोळखी मृतदेह आढळला : पोलिसांचा तपास सुरू

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर बस स्थानकाशेजारील पाण्याच्या टाकी शेजारी एका ४५ ते ५० वयाच्या पुरुषाचा मृतदेह भोर बस स्थानकातील कर्मचाऱ्यांना शुक्रवार दि.२४ सकाळी आढळून आला.कर्मचाऱ्यांनी तात्काळ भोर पोलिसांशी संपर्क करून अनोळखी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. 
       पुढील तपास भोर पोलीस करीत असून अनोळखी मृतदेह गोऱ्या रंगाचा दाढी असलेला,अंगावर कपडे नसलेला असा असून त्याच्याकडे ओळख पटेल असे कोणतेही साधन नाही. अनोळखी मृतदेह कोणाच्या ओळखीचा तसेच संबंधातून असल्यास भोर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
                                   
To Top