Khandala Breaking l शिरवळमध्ये राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
शिरवळ : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरवळ (ता. खंडाळा) येथे कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत हातभट्टी दारूसह चारचाकी वाहन असा एकूण ४ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल २०२६ रोजी शिरवळ परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. 
          
            त्यानुसार सापळा रचून एका कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ३५ लिटर क्षमतेचे १२ प्लास्टिक कॅन मिळून आले, ज्यामध्ये एकूण ४२० लिटर हातभट्टी दारू आढळून आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (अ) (ई) नुसार गुन्हा (रजिस्टर नं. १२७/२०२६) दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सातारा अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या पथकात निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात कुठेही हातभट्टी किंवा बनावट दारूची निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास नागरिकांनी तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक भूतकर यांनी केले आहे.
To Top