सुपे परगणा l सुप्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील हनुमान मंदिरामध्ये ग्रामस्थांच्यावतीने हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी येथील मंदिरात फुलांची आकर्षक सजावट तसेच मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.  
      येथील मंदिरात पहाटे पुजा तसेच जन्माचे अभंग गाऊन मुर्तीवर फुले उधळुन हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सावतामाळी, श्रीराम, जय भवानी भजनी मंडळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भजन तसेच महाआरतीचा कार्यक्रम झाला. 
     हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यावर येथील मंडळाच्यावतीने ग्रामस्थांना सुंटवड्याचे वाटप करण्यात आले. तसेच गोड महाप्रसाद देण्यात आला. तसेच यावेळी येथील हनुमान मंदिरात भाविकाच्यावतीने चांदीचे डोळे अर्पण केले असल्याची माहिती हनुमान मित्र मंडळाच्यावतीने देण्यात आली.
    दरम्यान बोरकरवाडी येथील हनुमान जन्मोत्सव यात्रा साध्या पद्धतीने करण्यात आली आहे. यावेळी सकाळी जन्मोत्सव, रात्री दंडवत, शेरनी वाटप तसेच पालखी मिरवणूक साध्या पद्धतीने होणार आहे. 
    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे येथील यात्रा उत्सवातील तमाशा, आर्केस्ट्रा आणि कुस्त्या आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमेटीच्यावतीने देण्यात आली.
               
To Top