सुपे परगणा l ॲल्युमिनियम तारा चोरणारी टोळी जेरबंद : सुपे पोलिसांची दमदार कामगिरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
 बारामती तालुक्यातील खंडूखैरेवाडी आणि शेरेचीवाडी हद्दीतील टॉवर लाईनच्या ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी टोळी जेरबंद करून सुपे पोलीस स्टेशनने दमदार कामगिरी केली आहे.
        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मारूती हळदेकर ( वय २३ वर्षे हल्ली रा. मेदनकरवाडी चाकण ता. खेड जि. पुणे मुळ रा. इकळीमोर ता. नायगाव जि. नांदेड ), मोहनसिंग धनसिंग राजपुत ( वय ३६ वर्षे रा. केसनंद वाघोली ता. हवेली जि. पुणे मुळ पत्ता मुपो. कन्होजा तहसिल- कुम्बंलगड जि. राजसमन राज्य. राजस्थान ), सुरज राजु गिरम उर्फे सुरज डोंगरे ( वय २१ वर्ष रा. मेदनकरवाडी चाकन ता. खेड जि. पुणे मुळ रा. फुलारवाडी पोस्ट वाघाळा त पाथरी जि. परभणी ) कलाम अब्दुल हमीद खान ( सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे मुळ रा. पिडवा पो. असनार तहसील बासी जि. सिदधार्थनगर उत्तरप्रदेश ), अर्जन श्रीराम यादव ( सध्या रा. कुरकुंभ ता. दौंड जि.पुणे मुळ रा. माधवपुर ता. तुळशीपुर जि. बलरामपुर उत्तरप्रदेश ) आदी पाच जणांना यांना अटक करण्यात आली आहे.  
      खंडुखैरेवाडी येथील टॉवर क्रमांक १२४/० ते १२४/२ तसेच शेरेवाडी येथील टॉवर क्रमांक १२०/५ ते १२०/६ मधील ए एल ५९ झेब्रा कंडक्टर तार ०.६ कि मीटर प्रति ३६० रू. मीटर प्रमाणे तसेच ४.४ कि मीटर प्रति ३६० रू मीटर प्रमाणे असे एकूण १७ लाख ९९ हजार ५०० रू किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी ४ आणि ५ फेब्रुवारीला चोरल्याची घटना घडली होती. या चोरीचा गुन्हा १६ फेब्रुवारी रोजी सुपे पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सुपे पोलीसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्हयांचा तपास उघडकीस केला असता आरोपी कडुन १३ लाख ४९ हजार ८७५ रूपयांचा मुद्देमाल माल व गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने महिंद्रा कंपनीची बलोरो मॅक्स एक्स पिकअप ( क्र. एम. एच. १४ के. ए. ९४२९ )  व पल्सर मोटार सायकल ( क्र.  एम.एच २६ डि. ए. २१८५ ) आदी वाहने जप्त करण्यात आलेली आहे.
          सदर गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, सुपे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक मनोजकुमार नवसरे, सहा. पोलीस निरिक्षक प्रकाश पवार आदीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे. 

    सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरिक्षक जिनेश कोळी, पोलीस हवालदार संतोष पवार, महेंद्र गायकवाड, रूपेश साळुंखे, पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंखे, भाऊसाहेब चौधरी, चालक सोमनाथ होले आदीनी सहभाग घेवुन उत्कृष्ट तपास केला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस हवालदार संतोष पवार करीत आहेत.
Tags
To Top