Baramati Crime l वडगाव निंबाळकर अल्पवयीन अत्याचार प्रकरण..! फलटणच्या डॉक्टरसह कोऱ्हाळेचा भोंदूबाबा पोलिसांच्या ताब्यात

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
बारामती तालुक्यातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गर्भपात केल्याचा आरोप असलेल्या फलटण येथील डॉ.योगेश नरुटे व कोऱ्हाळे येथील पिंटू धुमाळ यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
                  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीवर काही दिवसांपूर्वी लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पीडितेच्या गर्भधारणेची बाब समोर आल्यानंतर तिला उपचारासाठी फलटण येथील डॉ. योगेश नरुटे यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, कायद्याने आवश्यक असलेल्या वैद्यकीय व शासकीय प्रक्रिया पूर्ण न करता तसेच बाल संरक्षण नियमांचे उल्लंघन करून गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणात लैंगिक अत्याचारासंबंधीचा गुन्हा तसेच अल्पवयीन मुलीच्या गर्भपातासंबंधी वैद्यकीय नियमांचे उल्लंघन झाल्याने गुन्हा अधिक गंभीर बनला आहे. पोलिसांनी डॉक्टरविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षण नागनाथ पाटील करत आहे       

तसेच, या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे, अत्याचार नेमका कोणी केला आणि गर्भपातासाठी कोणत्या व्यक्तींनी मदत केली याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत असून प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.या घटनेमुळे बारामती तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
To Top