Baramati News l बारामती तालुक्यात दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी : समीरा शेंडकर गणितात राज्यात दुसरी

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बारामती तालुक्यातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. सोमेश्वर विद्यालय, उत्कर्ष आश्रमशाळा आणि न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळेचा लौकिक उंचावला आहे.
सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगरचा दहावीचा निकाल ९८.३२ टक्के लागला. विद्यालयातील समिरा संतोष शेंडकर प्रथम, सिद्धी संजय अलगुडे द्वितीय तर राजलक्ष्मी अशोक लकडे तृतीय क्रमांक पटकावला. तसेच राजलक्ष्मी लकडे मागासवर्गीय प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवून विशेष यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सचिव भारत खोमणे तसेच प्राचार्य प्रमोद जगताप यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वाघळवाडी येथील उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला. प्रणिता नितीन डंगाणे प्रथम, सुदर्शन रावसाहेब खाडे द्वितीय तर प्रशांत बबन तांबे तृतीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत, संचालिका रोहिणी सावंत आणि मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला शाखेचाही १०० टक्के निकाल लागला. शौर्य मनजीतशिल कोंडे, श्रीदा सचिन भोसले आणि ओंकार अजित पेटकर यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. प्राचार्य एम. जी. जाधव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
To Top