Baramati News l नसरापूर अत्याचार प्रकरण ! बारामतीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून तीव्र निषेध

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
बारामती : प्रतिनिधी
 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानवी घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बारामती शाखेच्या वतीने भिगवण चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
                  या घटनेबद्दल संताप व्यक्त करत अभाविपने पीडित चिमुकलीला तात्काळ न्याय मिळावा, तसेच संबंधित आरोपीला कठोरात कठोर शिक्षा—फाशी—देण्यात यावी, अशी ठाम मागणी केली. समाजात वाढत चाललेल्या अशा घृणास्पद घटनांना आळा बसावा आणि महिलांवरील व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनात प्रदेश सहमंत्री श्रावणी बाचल, जिल्हा सहसयोजक ओंकार तावरे, शहर सहमंत्री तन्मयी कोंढाळकर, शहर संपर्क प्रमुख पारस हवलदार, शहर कार्यकारणी सदस्य आदित्य गुरसुळकर, टीसी कॉलेज संपर्क प्रमुख ओम परकाळे यांच्यासह जयदीप सपकळ, धनराज बागल, तेजस डेरे, निखिल जाधव, प्रतीक पाटील, श्रुती त्यारे, किरण साळवे, दीक्षा लोंढे, सिमरन मुलाणी, रोहित नरुटे, ओम काटे, तन्मय काजळे, शुभम शेंडे, वैभव शेंडे, सिद्धार्थ रासकर, प्रथमेश गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top