Baramati News l बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय, देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याची नोंद

सोमेश्वर रिपोर्टर live
बारामती : प्रतिनिधी 
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
 बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व कामगिरी करत देशातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मतमोजणीच्या 24 व्या फेरीअखेर त्यांना तब्बल 2,18,930 मते मिळाली असून त्यांनी 2,17,875 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला.
               यापूर्वी हा विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 2,14,835 मतांनी विजय मिळवला होता. मात्र, बारामतीतील या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी तो विक्रम मागे टाकत नवा इतिहास रचला आहे. सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांना आघाडी मिळत गेली आणि प्रत्येक फेरीत त्यांचा मताधिक्याचा आकडा वाढत राहिला. 24 व्या फेरीपर्यंत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर भक्कम पकड ठेवत विक्रमी विजय निश्चित केला. या निकालामुळे बारामतीसह संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

या निवडणुकीत इतर उमेदवारांना केवळ 4,837 मते मिळाली असून सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. दरम्यान, मतमोजणीपूर्वी काही उमेदवारांनी सूचक व अनुमोदकाच्या सह्या स्वतःच केल्याचा प्रकार समोर आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
To Top