Bhor Breaking l भोर-रामबाग रस्त्यावर एसटी व चारचाकीचा भीषण अपघात : अपघातात एकाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर- रामबाग मार्गावर भोर एसटी डेपो कडे येणारी एसटी बस तसेच रामबागकडे जाणाऱ्या इको गाडीची समोरासमोर धडक झाल्याने ईको गाडीतील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि.५ रोजी घडली. घटनास्थळी पोलीस प्रशासन पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू केली. 
         स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार भोर एसटी डेपोत येणारी एसटी बस एमएच ०६ एस ८२९४  (भोर - दुर्गाडी - भोर )व एसटी डेपो कडून रामबाग बाजूकडे जाणारी इको गाडी एमएच ०५ सीएम ५७५२ यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन इको गाडीतील एकाचा जागीच मृत्यू झाला.तर इको गाडीतील इतर प्रवासी गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
To Top