Daund Crime l दौंड तालुक्यात थरारक घटना : वडिलांकडून ९ वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
दौंड : प्रतिनिधी 
दौंड दि. ३ नसरापूर येथील अत्याचार प्रकरण ताजे असतानाच दौंड तालुक्यातील देऊळगावराजे हद्दीतील हनुमानवस्ती येथे अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका नराधम वडिलाने स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
             मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शांताराम चव्हाण (वय ३३, रा. देऊळगावराजे, ता. दौंड) याने आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या अनामिका (वय ९) या मुलीच्या गळ्यावर व हातावर झाडे तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटर मशीनने वार करत तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने मुलीचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बाप-लेकीच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासला गेला असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अनामिका आणि तिचा भाऊ संस्कार (वय १०) यांचे नुकतेच शाळेचे निकाल लागले होते. निकालातील क्रमांकात फेरफार केल्याच्या संशयावरून आरोपीने संतापाच्या भरात हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
To Top