सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
मेढा मोहाट पुला शेजारी शंकर कोंडीबा आखाडे वय ४० वर्षे रा. किल्लार मुऱ्हा ( केळघर ) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खबर अजय शंकर आखाडे याने पोलीस ठाण्यात दिली असल्याची पोलीसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की , दि. १९ रोजी सकाळी ७.३० ते १२.३० वाजण्याच्या सुमारास यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शंकर आखाडे हे आचारी काम करत होते.
त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतचे कारण समजून आले नसून पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची नोंद पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून अधिक तपास सपोनि सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखी पो हवालदार माने करीत आहेत.
