सुपे परगणा l कापड दुकानाचा पत्रा उचकटून ४० हजारांच्या रोख रक्कमेसह कपडे पळविले

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील सोंड परिसर ते बसस्थानकादरम्यान असलेल्या चार दुकानापैकी कापड दुकानाचा पत्रा उचकटून रोख ४० हजार आणि काही कपडे पळविल्याची घटना मंगळवारी ( दि. १९ ) मध्यरात्री दोनच्या दरम्यान घडली. मागिल पाच दिवसापूर्वी ढम वस्तीवरील साडेआठ तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी झाली होती. त्यामुळे सुपे परिसरात चोरीचे सत्र सुरूच राहिल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
  येथील उमेश लोणकर यांच्या यशवंत कापड दुकानावरील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी त्याच्या ड्रावर मध्ये असलेले रोख ४० हजार आणि काही कपडे तसेच सीसीटीव्हीचे डिव्हीआर घेवुन अज्ञात चोरटे पसार झाले.
 ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडल्याचे लोणकर यांनी सांगितले. त्यानंतर त्याचं दुकानाच्या लाईनमध्ये असलेले अथर्व इलेट्रिकल्स मधील काही सुट्टे पैसे तसेच सीसीटीव्हीचे डिव्हीआर घेवुन चोरटे पसार झाले. तर चांदगुडे आणि कोंडे यांच्या दोन दुकानांचा पत्रा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.
           दरम्यान येथील पोलीस उपनिरिक्षक जिनेश कोळी, के. व्ही. ताडगे यांनी घटना स्थळास्थळी भेट दिली. यावेळी अद्याप दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले. तर दुकानदारांनी आपआपल्या दुकानातून सुरक्षितता म्हणून सीसीटीव्ही बसविण्यात यावा असे आवाहन कोळी यांनी केले. यासंदर्भातील अधिक तपास सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
Tags
To Top