सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी सोमनाथ सोमाणी तर उपाध्यक्षपदी संपत दरेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष अतुल किंद्रे आणि उपाध्यक्ष अतुल शेडगे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडली.
अध्यक्षपदासाठी सोमनाथ सोमाणी आणि उपाध्यक्षपदासाठी संपत दरेकर यांचेच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पालवे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर केली.
निवडीनंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक विजय शिरवले, नरेश चव्हाण, दिलीप वरे, अतुल किंद्रे, अतुल शेडगे, मधुकर कानडे, विठ्ठल खोपडे, बबन जाधव, किशोर बांदल, बबन गिरे आणि नथू साळेकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष सोमनाथ सोमाणी आणि उपाध्यक्ष संपत दरेकर यांनी, शेतकऱ्यांना माफक दरात खते व बियाणे उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. तसेच भोर तालुका खरेदी-विक्री संघाच्या नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून संघाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
