सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर ते महाड महामार्गावरील वेनवडी गावच्या हद्दीत खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन वनविभागाने कारवाई करून सोमवार दि.२२ पहाटे वाहन तपासणी करीत असताना पकडले.या कारवाईत सुमारे अंदाजे १ लाख रुपये किंमतीची खैराची लाकडे तर अंदाजे ३ लाख रुपये किंमतीचे पिकअप वाहन असा एकूण ४ लाख रुपयांचामुद्देमाल जप्त केला.
वनविभागाच्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (एमएच १२ डब्ल्यू एक्स २०७१) तपासणीसाठी थांबविण्यात आली.पीक अपची चौकशी केली असता त्यामध्ये अवैध खैर प्रजाती लाकडाचे ओंडके वाहतूक केले जात असल्याचे समोर आल्याने संबंधित वाहन ताब्यात घेतले.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैराची लाकडे आढळून आली.या प्रकरणी भरत बबन चव्हाण (रा. आखले, ता. जि. सातारा) यांच्याविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.
पुढील कारवाई पुणे उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस,सहाय्यक वनसंरक्षक शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भोर वनक्षेत्रपाल शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक के.एम.हिमोणे, वनरक्षक सुदाम राठोड यांनी केली.
जप्त वाहन आणि खैर लाकडे वनविभागाच्या ताब्यात घेऊन भोर येथील वनविभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आली.
