सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : प्रतिनिधी
जावली तालुक्यातील ५४ गांवाचा रखडलेला बोंडारवाडी प्रकल्प ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालीच लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत अशी माहिती श्रमीक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर यांनी दिली.
बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत माहिती देण्यासाठी मेढा येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.या प्रसंगी बोंडारवाडी धरण कृती समितीचे आदिनाथ ओंबळे, वैभव ओंबळे, नारायण धनावडे, वर्षा उंबरकर आदी मान्यवर उपस्थीत होते.
याप्रसंगी अधिक माहिती देताना डॉ. पाटणकर म्हणाले, जावली तालुक्यातील ५४ गावांचा रखडलेला पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी श्रमिक मुक्ती दल आणि बोंडारवाडी कृतीसमीती यांचेवतीने १ जुन रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र विधानपरिषदेच्या निवडणूकीची आचारसहिता असल्याने व मोर्चाला उत्तर देण्यासाठी जिल्हाधिकारीच उपस्थीतिति राहू शकत नसल्याने मोर्चा रद्द करण्यात आला. मात्र आचारसहिता संपायच्या आत धरणाच्या ट्रायलपिटचा प्रश्न मार्गी न लागल्यास आचारसाहिता संपताच नियोजीत मोर्चा त्यावेळी काढण्यात येणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगीतले. डॉ पूढे म्हणाले, तालुक्यातील बोंडारवाडी धरण प्रकल्प गेली वर्षे प्रलंबीत असून या धरणामुळे परिसरातील ५४ गांवांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. दिवंगत विजराव मोकाशी यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी बोंडारवाडी धरण कृती समिती व श्रमिक मुक्तीदल यांच्यावतीने शासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अद्याप कामाला अपेक्षीत गती मिळालेली नाही.
या प्रकल्पासाठी तीन गांवाची शेती अल्पशहा बाधीत होत आहे. गावठाणाला कुठलही धक्का लागती नाही. आणि बाधीत शेतकऱ्यांना पाणलोट क्षेत्रातच २७१ हेक्टर क्षेत्र जमीन पुनर्वसनासाठी उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगीतले. महाराष्ट्राच्या वाट्याला शिल्लक असलेले पाणी स्व. विजयराव मोकाशी व मी कागदोपत्री तपासून शोधून काढले. आणि या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत. धरणाला मंजुरी मिळाली पण अद्याप धरणरेषा व ट्रायलपिट झाली नाही. ती लवकरात लवकर व्हावी हीच कृती समितीची प्रामाणिक मागणी आहे. बुडीत क्षेत्रातील लोकांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही व होवू देणार नाही यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू असे डॉ. यांनी सुचित केले.
राज्याचे बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी अनेकवेळा सकारात्मक बैठका झाल्या असुन त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली. कन्हेर पाठोपाठ, उरमोडी, तारळी, वांग, ही धरणे करताना ही प्रचंड विरोध झाला. पण धरणे झाली आणि त्यामुळे धरणपरिसरातील व त्या खालील लाभ क्षेत्रातील शेती सुजलाम, सुफलाम झाली. त्यामुळे ५४ गांवातील शेतकऱ्यांचा विकास व्हायचा असेल तर धरणाला विरोध न करता ते कसे पूर्ण होईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. असे आवाहन डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
या प्रसंगी नारायण सुर्वे, राजाराम ओंबळे, राजेंद्र जाधव,, महादेव जाधव, जगन्नाथ जाधव, विलास शिंदे, सुरेश कासुर्डे, श्रीरंग बैलकर, सुनिल जाधव, आदि उपस्थित होते.
