Jawali News l गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या बदलीवरून जावली पंचायत समितीत खडाजंगी; सदस्य ठाम, ठराव अखेर मंजूर : उपसभापतींकडून सदस्यांना एकेरी शब्दाचा वापर

सोमेश्वर रिपोर्टर live


सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : सोमनाथ साखरे
जावली पंचायत समितीची तिसरी मासिक सभा गट शिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बदली वरून चांगलीच गाजली असुन गरशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या बदलीच्या ठरावा बाबत सदस्य अतिष कदम व सौ. शिल्पा शिंदे यांनी ठाम भुमिका घेतली. त्या वेळी वातावरण चांगलेच तापले गेले अशावेळी उपसभापती गोरख महाडीक यांनी अतिष तुझी भुमीका नेहमी विरोधाची असल्याचे म्हटल्याने सन्मानिय सदस्यांचा एकेरी शब्दाचा वापर झाल्याचे दृष्य सभागृहात पहावयास मिळाले.
           पंचायत समिती जावलीची मासिक सभा मेढा येथे सभागृहात संपन्न झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सौरभ शिंदे होत. यावेळी उपसभापती गोरख महाडीक, सदस्य अतिष कदम,सौ. शिल्पा शिंदे, सौ. चारू शिला पवार, सौ. सुनिता दुंदळे, सभेचे सचिव डॉ. निलेश पाटील, नायब तहसिलदार सुनिल मुनाळे आणि सहाय्यक गटविकास अधिकारी झपाटे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
          मागील सभेत गटशिक्षणाधिकारी यांच्या बदलीचा ठराव मंजुर न झाल्याने सदस्य अतिष कदम व सौ. शिल्पा शिंदे सभागृहात आक्रमक झाल्याचे चित्र दिसुन आले. मी प्रत्येक मिटींगमध्ये गट शिक्षणाधिकारी यांच्या विषयी बोलतो आहे. मी खोट बोलत असेल तर खुशाल आमच्यावर कारवाई करा पण बदलीचा ठराव का पाठविला नाही यावर अतिष कदमांनी आवाज उठविला. 
         यावेळी सौ. शिंदे यांनी सहभागी होत सभागृहात सदस्यांचे, सभापतींचे, उपसभापतीचे, अधिकाऱ्यांचे प्रत्येकाचे एक स्थान आहे. प्रत्येकाच्या शब्दाला व्हेटेज आहे आणि त्याप्रमाणे सभागृहाचे कामकाज झाले पाहीजे अशी भूमिका मांडली. यावेळी एकत्र मिटींग घेवुन चर्चा झाली असल्याचे सचिव डॉ. निलेश पाटील यांनी सांगीतले.
        सदस्य अतिष कदम यांनी जावलीच्या शिष्यवृत्तीचा पॅटर्न ढासळला असल्याचे सांगुन एकही शिक्षक चर्चेमध्ये अधिकाऱ्याच्या बाजुने बोलला नसल्याचे निदर्शनास आणून देवुन दोन मिटींगमध्ये चर्चा होवुन कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त केली. यावेळी सभापती सौरभ शिंदे यांनी कारवाईचा निर्णय हा जिल्हापरिषदेत वरीष्ट पातळीवर होत असल्याचे सांगीतले.
          मला अनुभव नाही, मला पण विचारायला पाहीजे ना. मी एकटा भुमिका घेवु शकत नाही असे उपसभापती गोरख महाडीक यांनी सांगीतले. त्यावेळी ही तिसरी मासिक सभा असल्याची आठवण अतिष कदमांनी करून देताच आतिष तुझी पहिला पासुन विरोधी भुमीका आहे. ईथ बसल्यापासुन कधीही तुझी सहकार्याची भुमिका नसल्याचा आरोप उपसभापती गोरख महाडीक यांनी केला. त्यावर अधिकारी चांगल काम करताहेत का अस म्हणण आहे का ? अस प्रश्न विचारून आतिष कदम यांनी मी इतर अधिकाऱ्यांच्या बाबतीत काहीच म्हणत नाही पण याच अधिकाऱ्याच्या बाबततीत का बोलतो तर शिक्षकांच्या, महिलांच्या अधिकाऱ्याच्या विषयी तक्रारी आहेत म्हणून सांगतोय ना असे सांगुन संघटणेच्या अध्यक्षांनी तकार केली मी काय खोट बोलतो काय असेही कदम यांनी सांगीतले. त्यामुळे सभापती सौरभ शिंदे यांनी सभेमध्ये बदलीचा ठराव मंजुर करण्यास सांगुन कारवाई संदर्भात जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या सुचना सभेचे सचिवांना केल्या.
           कृषी विभागाकडून शेतकर्यांना कर्ज माफी मिळणार असल्याचे सांगुन शेकऱ्यांनी सोयाबीन, भुईमुग यांची मागणी ऑनलाईन पध्दतीने केली असल्याचे सांगीतले. एसटी महामंडळाचे वरीष्ट अधिकारी मिटींगला उपस्थित न राहता कोणाला तरी अपूर्ण माहीतीने पाठविता त्यामुळे आजच्या सभेला गैरहजर असल्याचे दाखवावे असे सभापती सौरभ शिंदे यांनी सुचना केली.
          सौर उर्जेसाठी सहासे ग्राहकांनी नोंद केली असुन स्मार्ट मिटर बसविण्यासाठी कोणावर ही सक्ती करण्यात येणार नसल्याचे  विज मंडळाकडून सांगण्यात आले. ग्राम पातळीवर महा ईसेवा सुरु करण्याच्या सुचना देवुन त्या ठिकाणी दाखल्यांचे काम केल्यास दाखले वेळेवर मिळतील. कोणाचे नुकसान होणार नाही असे नायब तहसिलदार सुनिल मुनाळे यांनी सांगीतले. 
          सभेचे कामकाज सुरु होण्यापूर्वी जवळवाडीचे ग्रामसेवक वैभव निकम यांचे निधन झाल्याने त्यांना श्रध्दाजली वाहण्यात आली तर वयोवृद्ध पासुन लहानापर्यत दहावी मध्ये परिक्षेत बसुन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांचा अभिनंदन ठराव मंजुर करण्यात आला. सभागृहाचे आभार गट विकास अधिकारी तथा सचिव डॉ. निलेश पाटील यांनी मानले.


To Top