Bhor Breaking l कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतरावजी थोपटे यांनी ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर -वेल्हा -मुळशीचे भाग्यविधाते तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतरावजी थोपटे यांचे  पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यांच वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने आजाराने निधन झाले.
     ⁠अनंतराव थोपटे भोर विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार म्हणून राहिले असून थोपटे अनेक वर्षे राज्य मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री होते. ते पुण्याचे पालकमंत्री देखील राहिले आहेत.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेनंतर थोपटे कॅाग्रेसचे विधीमंडळातील गटनेते होते.पुणे जिल्ह्यात कॅाग्रेस पक्ष वाढण्यात थोपटे यांचे मोठे योगदान होते. अनंतरावजी थोपटे साहेब यांच्या निधनाने माजी आमदार संग्राम थोपटे यांना पितृशोक झाला.
                                   
To Top