Purandar News l भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब इटकर यांची निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
भारतीय जनता पार्टीचे सासवड येथील निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब इटकर यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांच्या हस्ते बाळासाहेब इटकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 
      बाळासाहेब इटकर सध्या वडार कम्युनिटी कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय संघटनेत महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये जबाबदारी सांभाळलेली आहे. भटके विमुक्त समाजाबद्दल त्यांच्याकडे सखोल अभ्यास आहे.
 त्यामुळे पक्षाने त्यांना ही जबाबदारी पुन्हा एकदा दिलेली आहे. भटक्या विमुक्त समाजातील लोकांकरता तांडा सुधार प्रकल्पांतर्गत स्वतंत्र घरकुल योजना राबविण्याचा व प्रत्येक भटक्या समाजातील लोकांना ओळखपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
       पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे , भाजप नेते,बाबाराजे जाधवराव जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीशआप्पा जगताप, जेजुरी देवसंस्थान समितीचे अध्यक्ष अॅड. विश्वास पानसे, सासवड मंडल अध्यक्ष आनंद भैय्या जगताप, सरचिटणीस उदयनराज जगताप, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहनकाका भैरवकर, वीरेश दहिवले भगवान पवार आदी मान्यवरांनी बाळासाहेब इटकर यांची
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी
 निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.
To Top