सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील वाजेघर व वांगणी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करा आणि नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी द्या अशा सूचना आमदार शंकर मांडेकर यांनी दिल्या.
पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे कार्यालयात भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील विविध गावांच्या सार्वजनिक पाणी योजनांबाबत विस्तृत आढावा बैठक घेण्यात आली
यावेळी आमदार शंकर मांडेकर बोलत होते बोलताना ते म्हणाले की भोर मतदार संघातील वरोडी, खानापूर, नसरापूर, शिंदेवाडी, वांगणी, वाजेघर, मुळशी टप्पा १ व २, आंबवणे, नेरे
आदी योजना कार्यान्वित करा
नागरिकांना शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे चालू असलेली कामे अत्यंत दर्जेदार आणि निकषांनुसारच झाली पाहिजेत, अशा कडक सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या.
तसेच प्रशासकीय किंवा तांत्रिक अडचणींमुळे कामे रेंगाळणार नाहीत याची दक्षता घेत, सर्व योजना विहित मुदतीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंत्यांना दिले.
या बैठकीला पुणे प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे, जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन व कृषी विभाग सभापती अमोल नलावडे, जिल्हा परिषदेचे सदस्य,तानाजी मांगडे शांताराम इंगवले, विक्रम खुटवड, , मिलिंद वाळंज, प्रवीण जगदाळे राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत, मुळशी तालुका अध्यक्ष अंकुश मोरे, भोरचे उपसभापती विशाल कोंडे, राजगडचे उपसभापती संदीप खुटवड, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, प्रवीण धनवे, सदस्या काजलताई मोरे, उपाध्यक्ष बाबाजी शेळके, माजी अध्यक्ष संतोष रेणुसे, संबंधित पाणी योजनांचे ठेकेदार आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते
