Baramati Crime l अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी युवकाला पॉक्सो अंतर्गत अटक

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
बारामती वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील एका युवकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व पॉक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच, "तुझ्या आईला मी घर बांधून देतो," असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याचा, तसेच धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीसांनी संबंधित गुन्हा दाखल केला.
या प्रकरणातील आरोपी अक्षय नामदेव गुळुमकर (रा. को-हाळे बु., ता. बारामती, जि. पुणे) याला तात्काळ अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीसाठी रवानगी करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय जीवन मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहूल साबळे हे करीत आहेत.
To Top