Baramati News l ग्रामीण कृषी कार्यानुभवातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख : निंबुत येथे रावे अंतर्गत कृषीप्रयोग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
बारामती कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत निंबुत येथे शुक्रवारी (दि. ३) स्वागत समारंभ व कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आधुनिक शेती, ग्रामीण विकास आणि कृषी जनजागृतीबाबत विविध उपक्रमांची माहिती दिली. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वतःचा परिचय करून देत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांशी संवाद साधणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, कृषीविषयक जनजागृती करणे तसेच विविध ग्रामविकास उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
कृषी दिनाचे महत्त्वही यावेळी विशद करण्यात आले. यावेळी बारामती कृषी महाविद्यालयाचे खेती बचाव अभियान मार्गदर्शक गोडसे, एआय मार्गदर्शक आकाश गोडसे तसेच कृषी सहाय्यक अधिकारी गडाख यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा ऊस, केळी, पालेभाज्या आदी पिकांमध्ये होणारा उपयोग, आधुनिक शेतीतील बदल आणि भविष्यातील संधी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला शेतकरी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तन्वी मोरे, अनन्या हापसे, जानवी डोळस, सुवर्णा लोखंडे, राजकुंवर राजे भोसले, गायत्री जाधव आणि दिशा फडतरे या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी उपसरपंच अमरसिंह काकडे, विजयराव काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, संभाजी काकडे, विलास काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे, कुसुम काकडे, प्रमोद बनसोडे, अजय काकडे, प्रवीण काकडे, लघुउद्योजक स्वाती काकडे, विविध बचत गटांच्या महिला, आशा सेविका, शेतकरी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, शेतकऱ्यांनाही आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि एआयच्या वापराबाबत उपयुक्त माहिती मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
To Top