सुपे परगणा I सुपे रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अशोक बसाळे यांची निवड

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील रोटरी क्लब ऑफ सुपे परगण्याच्या अध्यक्षपदी अशोक बसाळे तर सचिवपदी अशोक लोणकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाॅमिनी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर विवेक दीक्षित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन रणजीत भोंगळे, सुपे गावचे‌ सरपंच तुषार हिरवे, सुप्याचे सपोनि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे उपस्थित होते. येथील सरपंच तुषार हिरवे उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विवेक दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले.
     तसेच या वर्षी रोटरीचे नवीन सदस्यत्व स्विकारलेले दीपक लोणकर, प्रकाश‌ चौधरी, दादा चोरमले‌ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक विकास आरोग्य, महीला आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन, प्लॅस्टिक मुक्त परीसर, युवकांना मार्गदर्शन आदी उद्दीष्टांची पूर्तता करणे. तसेच शेतकऱ्यांसाठी या वर्षात रोटरीच्या माध्यमातून १०० शेततळी हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्यातून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक बसाळे यांनी दिली.
         याप्रसंगी पुण्यातील डिस्ट्रीक्टचे डाॅ. समीर डोलारे, पार्श्वनाथ फरसोले, रविकिरण खारतोडे, रोटरी क्लब ऑफ सुपे व RCC ग्रुप सदस्य, इन्ट्रॅक्ट ग्रुपचे सदस्य, सुपे येथील माजी संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे व नूतन अध्यक्ष अशोक बसाळे यांनी रोटरी क्लबला प्रत्येकी दहा हजाराची देणगी दिली. 
   याप्रसंगी येथील मार्केटचे माजी सभापती शौकत कोतवाल, प्रकाश चांदगुडे, अनिल हिरवे, शफीक बागवान, सुदाम नेवसे, संतोष लोणकर, हरीचंद्र वाघ, रोहन सरोदे, माऊली चव्हाण, विजया कुतवळ, उषा चांदगुडे, मल्हारी खैरे, काळे सर, सुरेश फडतरे, अनिल देव, बापू सावंत, सुदाम हिरवे, अशोक जाधव, सुदाम नेवसे, सपकाळ सर, जगताप सर, घाटगे सर उपस्थित होते. यावेळी माजी अध्यक्ष पोपट चिपाडे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन प्राजक्ता गोलांडे यांनी केले. तर आभार अशोक लोणकर यांनी मानले.
To Top