Baramati News l कोळोलीतुन पंचलिंगेश्वर पालखीचे प्रस्थान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील कोळोली येथील पंचलिंगेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी टाळ मृदुंगनाच्या निनादात आणि विठ्ठल नामाचा जयघोष करीत येथील वातावरण भक्तीमय झाले होते. 
           येथील जिल्हा परिषद सदस्या पल्लवी खेत्रे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी पालखी समवेत असलेल्या वारकऱ्यांना खेत्रे यांच्यावतीने आरोग्य किट व पाऊसासाठी उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
      याप्रसंगी माजी सरपंच बाळासो खेञे, विष्णु काकडे, संतोष काटे, बाबासाहेब खेञे, तुषार रसाळ, मधुकर काटे, नाना रोडे यांच्यासह सर्व कोळोली ग्रामस्थ व आरोग्यविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी ज्ञानोबा - तुकाराम आणि विठ्ठल नामाचा गजर करीत पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
To Top