बारामती | स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त करंजेपुल येथे भव्य रक्तदान शिबिर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
     राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त करंजेपुल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना मुख्य शाखा सोमेश्वर नगर, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ ,वडगाव निंबाळकर पोलीस व करंजेपुल औट पोस्ट, करंजेपुल ग्रामपंचायत मधील ग्रामस्थ,सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी,सोमेश्वरनगर पंचक्रोशी तील विविध सामाजिक संघटना यांचे संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करणेत आले आहे.रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता करंजेपूल पोलीस चौकी समोरील मैदानात हे शिबीर पार पडणार आहे. 
शिबिरामधे प्रत्येक रक्तदात्याला रेड प्लस ब्लड ब्लॅक,पुणे यांच्यातर्फे प्रमाणपत्र व आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे.
     शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व पंचक्रोशीतील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
 सदर शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन मानवता धर्माचे पालन करावे असे आवाहन सैनिक संघटना अध्यक्ष ताराचंद शेंडकर,संस्थापक जगन्नाथ लकडे, गणेश आळंदीकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे,पत्रकार हल्ला विरोधी समिती अध्यक्ष महेश जगताप ,सामाजिक कार्यकर्ते दत्ता माळशिकारे, संतोष शेंडकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे चे सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते व करंजेपुल चौकीतील पोलीस अधिकारी वर्गाने केले आहे.
      करंजेपुल च्या सरपंच पूजा वैभव गायकवाड, सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी संचालक रमाकांत गायकवाड, करंजेपुल तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सागर गायकवाड, राष्ट्रवादीचे हरीश गायकवाड ,दीप उजाला फाऊंडेशन चे विश्वस्त संदीप साखरे, आरोग्य कर्मचारी परवेझ मुलाणी ई.मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
To Top