Bhor News l भविष्यकाळ घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनो उच्च शिक्षणाला महत्त्व द्या -प्राचार्य अजय काळभोर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
प्रतिनिधी : संतोष म्हस्के 
      शिक्षण ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच कलागुणांना वाव देत विद्यार्थी दशेत भविष्यकाळ घडवण्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे.शिक्षणामुळे उच्च पदस्त होण्याची संधी मिळते.भविष्यकाळ घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला महत्त्व द्या असे मत श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जूनियर कॉलेज भोरचे प्राचार्य अजय काळभोर यांनी व्यक्त केले. 
     भोर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील अकरावी नवीन प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्राचार्य काळभोर बोलत होते. यावेळी ११ वी प्रविष्ट नवागतांचे स्वागत पुष्प देऊन करण्यात आले. 
विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या जीवनातील पहिल्याच दिवशी शंभर टक्के हजेरी लावली. तर पहिल्या दिवसापासूनच विद्यालयातील शिक्षकांकडून दैनंदिन शैक्षणिक कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तर नवीन अकरावी प्रविष्ट विद्यार्थिनी पै.दर्शना म्हस्के व श्रीशांत जाधव यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी रोबोकॉप कम्प्युटर संचालक प्रा.विजय जाधव,एस. एम.पोवार, एस.वाय.बांदल, डी.एस.चिकणे, आर. एम.दळवी, व्ही.आर.मेमाणे, ए.ए.पवार आदींसह शिक्षक उपस्थित होते. प्राचार्य काळभोर पुढे म्हणाले श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात वेळ तसेच शिस्तीला महत्त्व दिले जाते. 
विद्यालयातील प्राध्यापकांकडून शालेय शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना काहीही कमी पडून दिले जाणार नाही.वेळेत सर्वकाही शैक्षणिक गोष्टी करून विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयात विशेष प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांनी भविष्यकाळ घडविण्यासाठी कलागुणांना वाव देत अभ्यासाकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. विद्यार्थी विद्यालयाचा प्रमुख घटक समजून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण शिक्षण दिले जाणार आहे.
Tags
To Top