सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे रक्तदान शिबीर पार पडले.येथील बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ मुख्य शाखा सोमेश्वरनगर,सोमेश्वर स्पोर्ट्स अकॅडमी व बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने हे शिबीर पार पडले.या शिबिरामध्ये १०२ जणांनी रक्तदान केले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते या शिबिराचे उद्घाटन करणेत आले.त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या समाजकार्याचा रथ सर्वांनी पुढे नेणे हेच त्यांना आपले विनम्र अभिवादन असेल असे मत यावेळी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार,पार्थ पवार व जयदादा पवार यांना खंबीर साथ देऊन विकासाचा रथ पुढे नेऊ .आजी माजी सैनिक संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामुळे कित्येक जीव वाचणार आहेत त्यामुळे सर्व संघांचे कार्याचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे ,सोमेश्वर कारखाना माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर,माजी संचालक रमाकांत गायकवाड, लक्ष्मण गोफणे,संचालक ऋषिकेश गायकवाड, माजी सरपंच वैभव गायकवाड,पत्रकार संघाचे अध्यक्ष युवराज खोमणे,करंजे गावाचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे,पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्यासह करंजेपुल चे माजी उपसरपंच निलेश गायकवाड,तंटामुक्ती चे माजी अध्यक्ष सागर गायकवाड यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सैनिक संघटनेचे तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड.गणेश आळंदीकर यांनी रक्तदान शिबिरात सहभागी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी रेड क्रॉस ब्लड बँक पुणे यांच्या वतीने अर्चना पाफळ यांनी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र दिली. पत्रकार संतोष शेंडकर,चिंतामणी क्षीरसागर,सुशील अडागळे, सुनील जाधव ई.नी रक्तदादात्यांना रक्तदानाचे महत्व पटवून दिले.पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचेवतीने मान्यवरांना कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांचे आत्मचरित्रात्मक पुस्तके दिली व अजित पवार यांची क्रीडा धोरणे किती उपयोगी आहेत याची माहिती दिली. सैनिक संघटनेचे ॲड गणेश आळंदीकर यांचा देखील पुरुषोत्तम जगताप यांचे हस्ते सत्कार करणेत आला.अध्यक्ष ताराचंद शेंडकर यांनी आभार मानले
