Baramati News l अजितवृक्ष लावून सोमेश्वर फॉरेस्ट ग्रुपतर्फे स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभिवादन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल व सोमेश्वरनगर  येथील काही तरुण एकत्र येतात.. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे वृक्षप्रेमी होते हे जाणून करंजीपुर वनक्षेत्रामध्ये सात सात फूट उंचीचे सात सोनचाफ्याची  झाडे  सकाळी सात वाजताच लावतात..त्यांना अजितवृक्ष नाव देतात व त्या वृक्षांची कायमस्वरूपी संगोपन करण्याची हमी देतात व अजित पवार यांना विनम्र अभिवादन करतात.
   
   सकाळी सकाळी वेगाने चालण्याचा व्यायाम करीत स्वेच्छेने हे युवक नियमित वनक्षेत्रातील झाडांची देखभाल करतात. रायगड सारखे किल्ले सर करीत तिथेही स्वच्छतेचे धडे गिरवतात. 
     करंजेपुल येथील परवेश  मुलानी,सागर गायकवाड, संदीप साखरे, ॲड गणेश आळंदीकर, निलेश गायकवाड,उदय किर्वे, संदीप साळुंखे, दत्तात्रय जाधव, जालिंदर गायकवाड, सचिन खैरे, चेतन बोबडे,  हरीश गायकवाड, सूरज जाधव, सुरज ऊर्फ सोजल गायकवाड, राजेंद्र पवार,राहुल गायकवाड व जिशान मुलाणी  आदी ग्रुप सदस्यांनी हा उपक्रम पार पाडला. यावेळी सोमेश्वर कारखाना संचालक ऋषिकेश गायकवाड, वाघळवाडी चे सरपंच  ॲड. हेमंत गायकवाड, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे, योगेश सोळसकर, प्राजक्ता सोळसकर, दिव्यतेज शेंडकर इत्यादी मान्यवरांनी सर्व ग्रुप सदस्यांच्या कार्याचे कौतुक करीत स्वतः देखील  श्रमदान केले. 
      विधायक कामासाठी एकत्र येऊन सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रुप सदस्यांनी रविवारी आजी-माजी सैनिक संघ आयोजित रक्तदान शिबिरात देखील मोठा सहभाग नोंदविला.
To Top