सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे
दिल्ली येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या एका या विद्यार्थ्यावर झालेला अमानुष हल्ला व त्यांच्यावर करण्यात आलेला लाठीमार हा लोकशाही मूल्यांवर झालेला गंभीर आघात असून या घटनेचा राजगड तालुका वंचित बहुजन आघाडी तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलन प्रतिसात देत राजगड तालुका विंचित बहुजन आघाडी कडून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार निवास ढाणे व सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे ही लोकशाही व्यवस्थेची जबाबदारी आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार दि. २३ जुलै २०२६ रोजी संपूर्ण 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे.
या बंदला भारतीय बहुजन सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस पक्ष तसेच इतर सामाजिक व राजकीय संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. राजगड तालुक्यात बंद पूर्णतः शांततेत व अहिंसक मार्गाने पार पडावा, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली
यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बापू शिंदे जिल्हा प्रवक्ते महेंद्र भागोजी गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष महादेव खाटपे सुरेश भोसले उपाध्यक्ष विलास गायकवाड विनोद गायकवाड संतोष गायकवाड तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
